बांगलादेश सरकारचे कारखान्यांना साखरेच्या दरात कपात करण्याचे निर्देश

ढाका : महसूल प्राधिकरणाकडून साखरेच्या किमती घटविण्यासाठी कच्च्या आणि रिफाईंड साखरेचे आयात शुल्क कमी केल्याच्या तीन आठवड्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने साखर कारखानदार आणि रिफायनरींना किरकोळ दरावर साखरेच्या किमती ५ टका प्रती किलो कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रेडिंग कॉरपोरेशन ऑफ बांगलादेश (टीसीबी) च्या म्हणण्यानुसार, सरकारने एक फेब्रुवारी रोजी खुल्या आणि पॅकेज्ड साखरेचे दर अनुक्रमे १०७ आणि ११२ टका निश्चित केले होते. मात्र, ढाक्यातील बाजारपेठेत व्यापारी ११५ टका आणि १२० टका दर आकारत आहेत.

वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि बाजारातील स्थितीबाबत कार्यदलाच्या बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत सांगितले की, शुल्कात कपातीनंतर आयात साखर अद्यापही बाजारात आलेली नाही. ते म्हणाले की, आयात शुल्क तपातीनंतर साखरेच्या रिटेल किमतीत ४.५ टका प्रती किलोची घट येऊ शकेल. राष्ट्रीय महसूल बोर्डा (एनबीआर) ने २६ फेब्रुवारी रोजी एका अधिसूचनेच्या माध्यमातून आयातीवरील नियमक शुल्क ३० टक्क्यांवरुन घटवून २५ टक्के केले आहे. याशिवाय, तत्काळ प्रभावाने कच्च्या साखरेच्या आयातीवर ३,००० टका प्रती टन आणि रिफाईंड साखरेवर ६,००० टका शुल्क मागे घेण्यात आले आहे. एनबीआरच्या माध्यमातून कच्ची व रिफाईंड साखरेचा एकूण आयात खर्च अनुक्रमे ६,५०० टका आणि ९,००० टका प्रती टन कमी होईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here