भीमा साखर कारखान्याकडे १३५ कोटींची थकबाकी

पुणे : सहकारी साखर कारखान्यांना जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज दिले जाते. दौंड तालुक्यातील भीमा सहकारी कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेले 135 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेची विक्री न झाल्याने हें कर्ज थकीत आहे, यातून मार्ग काढण्यात येणार असल्याचे भीमा कारखान्याचे अध्यक्ष आणि आम. राहुल कुल यांनी सांगितले.

बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले, थकबाकीमुळे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढल्याने बँकेचे आर्थिक नुकसान होत आहे, परंतु बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत नाही. जिल्हा बँक ही संबंधित कारखान्याकडील उत्पादित साखरेच्या तारणावर उचल रुपाने बँक कर्ज देते. त्यामुळे कारखान्यांकडे फारशी थकबाकी शिल्लक राहात नाही. परंतु भीमा कारखाना याला अपवाद ठरला आहे. या कारखान्याने वीजिनिर्मिती प्रकल्पासाठी मध्यम मुदतीचे कर्ज घेतले आहे.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here