ब्राझील: Raizen चा अ‍ॅसेट विक्री आणि भागीदारीवर विचार

साओ पाउलो : ब्राझीलची ऊर्जा कंपनी रायझेन एनर्जी (Raizen Energia SA) आपल्या व्यावसायिक युनिटमध्ये विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्गुंतवणुकी (divestment) च्या संधी आणि धोरणात्मक भागीदारीबाबत विचार करीत आहे. Raizen चे सीईओ रिकार्डो मुसा यांनी गुंतवणूकदारांसोबतच्या एका बैठकीत सांगितले की, कंपनीकडे अनेक अ‍ॅसेट्स आहेत, त्यांची विक्री अथवा भागीदारीच्या माध्यमातून कमाई करणे शक्य आहे.

मुसा यांनी सांगितले की, या “पोर्टफोलियो रिसायकलींग” योजनेसाठी कोणतेही विशिष्ट लक्ष्य निर्धारीत करण्यात आलेले नाही. कंपनीच्या दीर्घकालीन धोरणावर परिणाम होवू न देता खूप विचारपूर्वक सौदा केला जाईल. साखरेशी संबंधीत बाबींची माहिती देताना मुसा म्हणाले की, आम्ही साखरेमध्ये आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय तेव्हाच घेऊ, जेव्हा साखरेच्या किमती या २२ अथवा २३ सेंट प्रती पाऊंडच्या वर असतील.

मुसा म्हणाले की, निर्गुंतवणुकीचे परिणाम विविध घटकांवर अवलंबून आहेत. यंदा ब्राझीलमध्ये ऊस पिक, अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करीत आहे. रायझेन, ब्राझीलमधील सर्वात मोठ्या इंधन वितरकांपैकी एक असून सोबतच साखर तसेच इथेनॉल क्षेत्रात कार्यरत आहे. ते म्हणाले, विज क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन Raizen पॉवर या व्यावसायिक युनिटसाठी आता भागीदारांचा शोध सुरू आहे. हे नवे युनिट ६ मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोचून आपली कमाई तिप्पट करण्याच्या उद्दिष्टाने काम करेल. विद्युत शक्ती आणि डी कार्बोनाइजेशनचा पर्याय बनण्यात अग्रेसर राहण्याची अपेक्षा आहे. रायझेन पॉवरचे ऊर्जा आणि नविकरणीय ऊर्जा प्रमुख फ्रेडरिक सलीबा यांनी सांगितले की, या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठीचा कालावधी नियामक प्रगतीवर अवलंबून असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here