ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात गाळप झाले कमी; संततधार पावसाचा परिणाम

साओ पाऊलो (ब्राझील) : चीनी मंडी

जगातील साखरेचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये ऊस गाळप घसरल्याचे असल्याचे दिसत आहे. विशेषतः सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या दक्षिण मध्य ब्राझीलमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील आकड्यांवर नजर टाकली तर, गाळप वर्षाला १० टक्क्यांनी घसरले आहे. तर त्या आधीच्या दोन आठवड्यांचा विचार केला, तर गाळप १५ टक्क्यांनी घसरले आहे. एस अँड पी ग्लोबल प्लॅट्सने केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. २०१८-१९च्या हंगामात या काळात सर्वांत कमी साखर उत्पादन झाले आहे. या भागात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गाळप कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

२०१८-१९च्या हंगामाचा विचार केला, तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात झालेले गाळप हे या हंगामातील सर्वांत कमी गाळप आहे. या संदर्भात साखर उद्योग संघटना यूएनआयसीए यांच्याकडून साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यात येणार आहे. गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना दक्षिण मध्य प्रांतामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाचा मोठा अडथळा आला आहे.

या संदर्भातील सर्वेक्षण करताना पावसामुळे ४.७ दिवसांचे नुकसान झाल्याचे मानले जात आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांत ५.४ दिवसांचे तर गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ४.९ दिवसांची नुकसान झाले होते. या हंगामाचा एकूण विचार केला तर, ५३९.४३ मिलियन टन गाळप होण्याची अपेक्षा होती. गाळपाचा आकडा दर वर्षीच्या आकडेवारीपेक्षा ४.६ टक्क्यांनी कमी झाला आहे.

एस अँड पी ग्लोबल प्लॅट्स यांनी कमी झालेल्या गाळपाची गेल्या वर्षीच्या हंगाम संपण्याच्या काळाशी तुलना केली आहे. सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑक्टोबरच्या सुरवातीपासून गाळप कमी होत गेल्याचे दिसत आहे. पावसामुळे गेल्या दोन आठवड्यांत उसाची रिकव्हरी प्रति टन १३३.९६ किलो वरून १२८.७० किलोपर्यंत खाली आली आहे. दरवर्षी यात प्रति टन ३.८२ किलोची घट होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मध्य प्रांतात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साखर उत्पादन करण्यासाठी अपेक्षित असलेल्या उसामध्ये ३०.१८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर घसरण झाली. गेल्या वर्षीच्या याच काळात ४२.४० टक्के उसाची नोंद झाली होती. त्यातुलनेत यंदाचा आकडा खूपच घसरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत हे निचांकी साखर मिश्रण आहे. हंगामाच्या सुरुवातीला एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात साखर मिश्रण ३१.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.

नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत ७ लाख ७७ हजार ४०० टन साखर उत्पादन होणे अपेक्षित होते. वर्षानुवर्षांच्या आकडेवारी तुलना केली तर, त्यात ३८ टक्क्यांची तर, ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांशी तुलना केली, तर १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. मुळात एप्रिल ते १६ नोव्हेंबर दरम्यान २५०.१३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. वार्षिक उत्पादनापेक्षा हे उत्पादन २७ टक्क्यांनी कमी आहे. आजवर २००८-०९ नंतरचे हे सर्वांत कमी साखर उत्पादन आहे.

या आकडेवारीवरून यापुढेही ऊस मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादनासाठीच वापरला जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत ८ हजार १६० लाख लिटर इथेनॉल उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षांची तुलना केली, तर यात ३९.५ टक्क्यांनी वाढ दिसत असली, तरी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत यात १६ टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिलमधील हंगाम सुरू झाल्यानंतरचे हे सर्वांत निचांकी उत्पादन आहे. समाधानाची बाब ही आहे की, एप्रिल ते १६ नोव्हेंबर दरम्यान झालेले एकूण उत्पादन ४५.५ टक्क्यांनी वाढले आहे.

एक एप्रिल ते १६ नोव्हेंबर या काळातील एकूण इथेनॉल उत्पादन पाहिले ८६० कोटी लिटर तर ते १५ टक्क्यांनी घसरल्याचे दिसत आहे. २०१२-१३नंतरचे हे आजवरचे निचांकी उत्पादन आहे. त्यावेळी ७९० कोटी लिटर उत्पादन झाले होते.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here