कोल्हापूर : मध्यंतरी वाढलेले साखरेचे दर हा फुगवटा होता, त्याचा साखर कारखान्यांना अपेक्षित फायदा झाला नाही. केंद्र शासनाने साखरेचा दर ५० रुपये प्रतिकिलो आणि इथेनॉलचा दर ७५ रुपये प्रतिलिटर स्थिर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी खासदार संजय मंडलिक यांनी कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. यावेळी ‘बीओटी’ तत्त्वावर कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यास सभेत एकमताने मंजुरी दिली.
मंडलिक म्हणाले, ‘आतापर्यंत एफआरपीपेक्षा जादा ऊसदर दिला आहे. ऊस विकास योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. एकरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या पहिल्या तीन शेतकऱ्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी स्वागत केले.एन. वाय. पाटील यांनी अहवालाचे वाचन केले. शिवाजीराव चौगले यांनी अभिनंदनाचा ठराव विजय भोसले, ए. बी. पाटील यांनी मांडला. विश्वास कुराडे, आनंदा फराकटे, शिवाजीराव इंगळे, शिवानंद माळ, शेखर सावंत, राज कांबळे आदी उपस्थित होते.

















