छत्तीसगड : ७०० टन साखर घोटाळ्यानंतर व्यवहारात बदल, आता तपासणीनंतरच पोस्ट-डेटेड चेकचे होणार व्यवहार

रायपूर : साखर व्यापाऱ्यांनी नुकत्याच उघडकीस आलेल्या सुमारे ७०० टन साखरेच्या पुरवठ्यासाठी २.०१ कोटी रुपयांच्या कथित पेमेंट घोटाळ्यानंतर, आपल्या व्यवहारांचे नियम अधिक कडक केले आहेत. व्यापारी आता सखोल तपासणीशिवाय मोठ्या प्रमाणात मालाची पाठवणी करणे टाळत आहेत. खरेदीदाराची आर्थिक स्थिती, पैसे देण्याची क्षमता आणि बँकिंग नोंदी यांची कसून तपासणी केल्यानंतरच व्यवहाराचा निर्णय घेत आहेत. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, भविष्यात कोणताही मोठा व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी खरेदीदाराचे मागील व्यवहार, आर्थिक स्थिती आणि पतपात्रता यांचे मूल्यांकन केले जाईल. याव्यतिरिक्त, फसवणूक टाळण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पोस्ट-डेटेड चेक (पीडीसी), डिजिटल पडताळणी आणि बँकिंग नोंदींवर आधारित असेल असे एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते ५ मे दरम्यान, रायगडच्या कोलिंदी कुंज येथील रहिवासी असलेले व्यावसायिक राजेश अग्रवाल आणि त्यांचा मुलगा शैलेश अग्रवाल यांनी रायपूरमधील काही व्यापाऱ्यांकडून अंदाजे २० ट्रक साखर, म्हणजेच सुमारे ७०० टन, खरेदी केली. या मालाचे मूल्य अंदाजे २ कोटी १ लाख ६३३ हजार रुपये आहे. मात्र, माल ताब्यात घेतल्यानंतर पैसे दिले नसल्याचा आरोप आहे. व्यापाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे, १४ जून रोजी रायपूरच्या खमतराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचे अटकपूर्व जामिनाचे अर्जही न्यायालयाने फेटाळले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

या घटनेनंतर, संबंधित व्यापारी आणि चेंबर ऑफ कॉमर्सने आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. अशा घटनांमुळे व्यावसायिक आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते असे त्यांनी सांगितले. खमतराई पोलिस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र जयस्वाल यांनी दोन्ही फरार आरोपींचा पथके सातत्याने शोध घेत आहेत. या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास केला जात असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here