पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाई रक्कमेत मुख्यमंत्र्यांकडून वाढ

बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी राज्यात पाऊस आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिक नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मदत दिल्याने सरकारी तिजोरीवर १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने कोविड महामारीच्या काळात आर्थिक तणाव असतानाही शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा त्यांनी केली.

बोम्मई म्हणाले, कागदपत्रे पाहिल्यानंतर ही मदत वाढवली जाणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटले. एनडीआरएफच्या निकषानुसरा शुष्क शेतीला ६८०० रुपये प्रती हेक्टर मदत दिली जात होती. आता राज्य सरकार यात स्वत:कडील ६८०० रुपये देऊन १३,६०० रुपये प्रति हेक्टेर मदत देईल. सिंचन असलेल्या शेतीला प्रती हेक्टर १३,५०० रुपयांची मदत दिली जाते. आम्ही यात आणखी ११५०० रुपयांची भर घालत आहोत. एकूण २५००० रुपये त्यांना मिळतील. तर बागायती शेतीला १८००० रुपयांवरून आता २८००० रुपयांची मदत केली जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here