डी. वाय. पाटील साखर कारखान्याकडून २० कोटींची ऊस बिले जमा : अध्यक्ष, आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने दुसऱ्या पंधरवड्यातील २० कोटी ४ लाख १६ हजारांचे ऊस बिल सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. कारखान्याने चालू हंगामात २७ डिसेंबर अखेर २ लाख ४० हजार ५९० टन उसाचे गाळप करुन २ लाख ३३ हजार ५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने १६ ते ३० नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप ६२ हजार ६३० टन गाळप केले आहे. कारखान्याने ३,२०० रुपये प्रती टन दराने बिल अदा केले आहे. या हंगामात कारखान्याने ५.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here