छाता साखर कारखाना सुरु झाला नाही तर शेतकरी उतरणार रस्त्यावर

125

कोसीकला : राष्ट्रीय शेतकरी मजुर महासंघाने इशारा दिला की, जर अनलॉक नंतर छाता साखर कारखानासुरु झाला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील.

राष्ट्रीय शेतकरी मजुर महासंघाने सोमवारी आर्य समाज धर्मशाळेत बैठक घेतली. बैठकीमध्ये ब्रज प्रांत अध्यक्ष दीपक चौधऱी म्हणाले की, केंद्र सरकारकडून आणण्यात येणारे तीन अध्यादेश, शेतकर्‍यांच्या गळ्यातील फास बनतील. आज बाजारात तांदूळ आणि गव्हाला चांगला भाव मिळत नाही.
त्यांनी सांगितले की, छाता येथील बंद पडलेला साखर कारखान्या संदर्भात वचन देवूनही आतार्यंत कोणतेही काम झाले नाही. इशारा देताना ते म्हणाले की, जर अनलॉक नंतर साखर कारखाना सुरु झाला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील.

ग्राम प्रधान संघटनेंचे जिल्हाध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले की, शेतकरी सरकारच्या खोट्या अश्‍वासनांनी जेरीस आले आहेत. छाता साखर कारखान्यासाठी आता शेतकरी नाइलाजाने आंदोलन करतील. बैठकीमध्ये ठाकूर अमरचंद, राम रजपूत, कन्हैयालाल, हुकम सिंह, जयपाल सिंह, विनोद ठाकुर, पवनसिंह चौधरी रज्जी, डॉ. निर्मल, सुघड सिंह, चौधरी कुमर सिंह, ओमन पंडित, कान्हा सिंह चौधरी, राम शेखर, ठाकुर बबलू सिंह आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शंकर नेता होते तर सूत्रसंचालन चंद्रपाल यदुवंशी यांनी केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here