सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना सन 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. विविध व्यवसाय राबविण्यासह त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधीची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीपूरक, सुगीपश्चात प्रकल्प तसेच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाणार आहे.

1 COMMENT

  1. संकल्पना चांगलीच आहे, मिळतय म्हणुन काहीतरी पण करायचे हा द्रुष्टिकोन नसावा,
    फक्त एवढेच सहकारी बँके पेक्षा जास्त जाचक व खर्चीक अटी नसाव्यात. एकाच दस्तकात कर्ज करार, वचन चिठ्ठी(Loan Agreement, D.P.Note etc.) असल्यास ग्रामीण भागातील अडचणी दुर होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here