एफसीआय एक फेब्रुवारीपासून गव्हाचा ऑनलाइन लिलाव करणार

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने (एफसीआय) एक फेब्रुवारीपासून माल उतरणी-भरणीसह २३५० रुपये प्रती क्विंटल अशा दराने राखीव गव्हाची विक्री सुरू करणार आहे. साप्ताहिक पद्धतीने या गव्हाची विक्री केली जाणार आहे. एफसीआय घाऊक खरेदीदारांना २५ लाख टन गव्हाची विक्री करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गहू तसेच आट्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ओपन सेल मार्केट योजना (ओएमएसएस) लागू केली आहे. बाजारात ३० लाख टन गव्हाचा बफर स्टॉक विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बुधवारी या योजनेची घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आली होती.

न्यूज २४ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, एफसीआय इलेक्ट्रॉनिक लिलावातून ३० लाख टन गहू टन गव्हाची विक्री करणार आहे. त्यापैकी घाऊक खरेदीदारांना २५ लाख टन गव्हाची विक्री केली जाईल. २ लाख टन गहू राज्य सरकारे आणि केंद्रशासीत प्रदेशांना आणि ३ लाख टन संस्था, सरकारी मालकीच्या सार्वजनिक उपक्रमांना सवलतीच्या दरात दिला जाणार आहे. गव्हाचे रुपांतर आट्यामध्ये केले जावे यासाठी प्रयत्न आहेत. तसेच गव्हाची विक्री २९.५० रुपये प्रती किलो यापेक्षा अधिक दराने केली जावू नये असे प्रयत्न आहेत. एफसीआयचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक अशोक के मिणा यांच्या म्हणण्यानुसार, एक फेब्रुवारी रोजी ईलेक्ट्रॉनिक लिलाव होईल. किमान १० टन ते जास्तीत जास्त ३००० टन खरेदी एका घाऊक खरेदीदाराला करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here