ओमीक्रॉनबाबत देशभर समान धोरण राबविण्याचे फिक्कीचे आवाहन

70

नवी दिल्ली : सरकारने कोरोना व्हायरसच्या नव्या ओम्रीकॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रवेशाच्या ठिकाणी समान धोरण अवलंबण्यात यावे असे आवाहन देशातील उद्योग संस्था फिक्कीने केले आहे. नव्या धोरणाचे नियमित पालन करण्यात यावे असे सांगण्यात आले. राज्य, शहर अथवा नगरपालिकेच्या स्तरावर कोणत्याही प्रकारची बेफिकीरी झाल्यास त्याचे व्यापक परिणाम होतील असे फिक्कीने म्हटले आहे.

सावधगिरी बाळगणे, कोविड संक्रमणाच्या दरात वाढीची पाहणी आणि आरटी-पीसीआर तपासणी संख्येत वाढ, विषाणूच्या नव्या रुपाची माहिती घेण्यासाठी जीनोम अनुक्रमण यासाठी गती आणण्याची गरज आहे असे मत फिक्कीने व्यक्त केले आहे. फिक्कीने म्हटले आहे की, आम्ही केंद्राकडून अशी अपेक्षा करतो की देशभरातील प्रवेश केंद्रांवर समान नियमांचे पालन केले जावे. यासाठी खास रुपाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

फिक्कीने सांगितले की, ओम्रीकॉनने कोविडचा धोका टळलेला नाही याची जाणिव करुन दिली आहे. त्यामुळे पूर्णपणे लसीकरण करणे आणि कोविडच्या नियमांचे पालन करणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here