विघ्नहर’ची गाळप क्षमता ७ हजार ५०० मे. टन करणार : चेअरमन सत्यशील शेरकर

पुणे : ऊस पिकाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्याची विघ्नहर कारखान्याची परंपरा राहिलेली आहे. भविष्यकाळातही ‘विघ्नहर ‘चा ऊसभाव कमी असणार नाही. शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर विघ्नहर कारखाना पुढील हंगामापासून प्रती दिनी ५ हजार मेट्रीक टन असलेली गाळप क्षमता ७ हजार ५०० मेट्रिक टन करणार आहे, अशी घोषणा चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली. बस्ती सावरगाव (ता. जुन्नर) येथे विघ्नहर कारखान्याच्या वतीने मंगळवारी साई समता मंगल कार्यालय आयोजित शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शेरकर म्हणाले की, कारखान्याकडून ऊस उत्पादकांच्या बांधावर जाऊन उत्पादकता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. विघ्नहर कारखान ऊस गाळपातही कधी कमी पडण नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, ‘विघ्नहर’चे उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, संदीप मोरडे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, गुलाब पारखे, जुन्नर बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे, मंगेश काकडे, शिवसेनेचे दिलीप बाह्मणे, बाजीराव ढोले, बाबा परदेशी, सोपान जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here