घोरपडे साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामास प्रारंभ

कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या ११ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सरव्यवस्थापक संजय घाटगे यांच्या हस्ते मोळीपूजन झाले.

घाटगे म्हणाले, ‘कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आठ कोटी युनिट वीजनिर्मिती व तीन कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा.’ यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here