गोवा: ऊस शेतकर्‍यांच्या सहकार्यासाठी समितीची स्थापना

76

पणजी, गोवा: गोवा सरकारने ऊसाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांना होणार्‍या अडचणींच्या समाधानासाठी ऊस शेतकरी सुविधा समितीची स्थापना केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सवाईकर यांना समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. सरकारकडून गुरुवारी 23 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली.

समितीच्या इतर सदस्यांमध्ये अपक्ष आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फलदेसाई, माजी मंत्री रमेश तावडेकर आणि ऊस शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई आदींचा समावेश आहे. संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक या समितीचे सदस्य सचिव आहेत. कृषी संचालक नेविल अल्फोंसो यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये, समिती राज्य स्तरीय समितीला रिपोर्ट करेल. हा आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंजुरीने जारी करण्यात आला आहे. साखर कारखाना गेल्या महिन्यात सहकार विभागाकडून कृषी विभागाच्या अधीन आणण्यात आला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here