कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामात ४ लाख ४४ हजार ३८५ टन उसाचे गाळप केले. गत हंगाम सुरू होण्यापूर्वी गळितास येणाऱ्या उसास पहिली उचल प्रतिटन ३,४१० आणि उर्वरित ९० प्रमाणे दुसरा हप्ता, असे प्रती टनास ३,५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. या आश्वासनाची आता पूर्तता करण्यात आली आहे. कारखान्याने आता प्रतिटन ९० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष संजय मंडलिक यांनी केले आहे.
साखर कारखान्याच्यावतीने गेल्या हंगामात गाळपास आलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे पहिला हप्ता प्रतिटन ३,४१० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केली आहे, अशी माहिती मंडलिक यांनी दिली. आता उर्वरीत हप्ता दिला जात असल्याचे सांगण्यात आले. याबाबत झालेल्या बैठकीला कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कुराडे, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, प्रधान भोजे, धनाजी बाचणकर, प्रदीप चव्हाण, कृष्णा शिंदे, नारायण चौगुले, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, संभाजी मोरे, महेश घाटगे, मंगल तुकान, वीरेंद्र मंडलिक, अनिल कांबळे, नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील, नेताजी पाटील, विष्णू बुवा, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सुदाम देसाई, एस. डी. पाटील उपस्थित होते.


















