फ्लेक्स-फ्युएल व्हेइकल्सला गतीने स्वीकारण्यासाठी जादा धोरणात्मक प्रोत्साहनाची गरज : टोयोटा किर्लोस्कर मोटर

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे देशाचे प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांच्या म्हणण्यानुसार, भारतात फ्लेक्स फ्युएल व्हेईकल्स (एफएफव्ही) जादा स्वीकारली जातील अशी शक्यता आहे. आणि आपल्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त सरकारी धोरणे सादर करण्याची गरज आहे. टोयाटो किर्लोस्कर कंपनीने गेल्या वर्षी फ्लेक्सी फ्यूएल इंधन, मजबूत हाइब्रिड इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानावर एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. सद्यस्थितीत भारतीय परिस्थितीमधील FFV मूल्यांकन करुन डेटा एकत्र केला जात आहे. एफएफव्ही आपल्या प्राथमिक आव्हानात ग्राहकांच्या स्वीकृतीची कमतरता दिसत आहे. त्यामुळे इथेनॉल वापरानंतर कार्यक्षमतेत घट होते अशी शंका उपस्थित होत आहे.

दि हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गुलाटी यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक स्वीकृती आणि फ्लेक्स इंधन असलेल्या वाहनांना स्वाकीरण्यासाठीचा खर्च आणि इंधनाचा खर्च यातील फरक दूर करण्याची गरज आहे. केंद्र सरकार गतीने स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देणारी धोरणे सादर करीत आहे. आणि त्यामुळे जर ग्राहकांच्या स्वीकृतीच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त धोरणे लागू केली गेली, तर एफएफव्हीची मंजुरी गतीने वाढेल.

सरकार आणि विविध भागधारक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बन कमी करण्यासाठी पर्यायी इंधनावर सक्रियपणे काम करत आहेत. अलिकडेच सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाची सुरुवात केली आहे. याशिवाय Reliance Industries Ltd. (RIL) आणि BP यांदरम्यान इंधन आणि गतीशीलता या क्षेत्रातील संयुक्त उपक्रम Jio-BP ने E२० मिश्रीत इंधन लाँच केले आहे. ते म्हणाले की, भारतात इथेनॉल खूप महत्त्वाचे आहे. कारण ते स्वयंपूर्ण तंत्र आहे, मग ते इंधन असो वा ऊस आणि इतर खाद्यान्न. मोटार वाहन क्षेत्रामध्ये फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या निर्मितीसाठी आणखी काही भौतिक परिवर्तन आणि अतिरिक्त विकासाची गरज आहे. त्यासाठी सध्याच्या तंत्रात सुधारण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here