हरियाणा : अवकाळी पावसाचा फटका, १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची भरपाईची मागणी

ऑक्टोबर महिन्यात पावसाने खराब झालेल्या भात-कापूस या पिकांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा करणाऱ्या हरियाणातील शेतकऱ्यांना जानेवारीत अवकाळी पावसाचा फटका सोसावा लागला आहे. आता सर्वाधिक फटका गहू, भाजीपाला आणि सूर्यफूल या पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. राज्यातील १६,६१७ शेतकऱ्यांनी कृषी विभागाने संपर्क साधून पंतप्रधान पिक विमा योजनेच्याअंतर्गत (पीएमएफबीवाय) नुकसान भरपाई मागितली आहे. भारतीय किसान युनियननेही खास नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत अंबाला आणि रेवाडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अधिक नुकसानभरपाईचे अर्ज आले आहेत.

रेवाडी जिल्ह्यात पाणी साठल्याने गहू आणि मोहरीच्या पिकांचे नुकसान झाल्याने २५३८ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अंबालामध्ये २११० शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे सांगत भरपाई मागितली आहे. मेवातमध्ये १४३५, रोहतमधून १७७०, चरखी दादरीहून १४३३, कुरुक्षेत्रमधून १३००, भिवानीहून ९१० आणि कर्नालमधून १४८ शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here