शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी युवा चेतना मंचचे धरणे

143

बलिया: भारतीय किसान युनीयनच्या आंदोलनाला आपला पाठिंबा देऊन युवा चेतना मंचचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन सुरू केले.

रोहित कुमार सिंह यांनी मंचच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा मुख्यालय चौकातील शहीद पार्कमध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना आरोप केला आहे की, नवी दिल्लीत सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करीत आहे. दिल्लीत लाल किल्ल्यामध्ये जी घटना घडली ती निंदनीय आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या या घटनेमागे भाजप आणि संघाचा हात आहे.

संपूर्ण देश शेतकरी नेता राकेश टिकैत यांच्यासोबत असल्याचेही सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, जर टिकैत यांना काही धोका पोहोचला तर त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार आहेत याची त्यांनी जाणीव ठेवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here