२०२०-२१ हंगामात भारताकडून ७.१ मिलियन टन साखर निर्यात

नवी दिल्ली : चांगली मागणी आणि केंद्र सरकारने दिलेले आर्थिक पाठबळ यामुळे गेल्या महिन्यात समाप्त झालेल्या २०२०-२१ या हंगामात भारताने ७.१ मिलियन टन साखर निर्यात केल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) म्हटले आहे.

साखर उद्योगाशी संबंधीत एका वेबिनारमध्ये बोलताना इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन ३१ मिलियन टन होईल असे अनुमान आहे. साखरेचे एकूण साठा ३९.५ मिलियन टनापर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. त्यापैकी ८.५ मिलियन टनाचा सुरुवातीचा साठा असेल.
वर्मा यांनी सांगितले की, देशातील साखरेचा एकूण खप २६.५ मिलियन टनापर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. तर ६ मिलियन टन साखरेची निर्यात होईल असा अंदाज आहे. या हंगामाच्या समाप्तीपर्यंत साखरेचा साठा ७ मिलियन टनापर्यंत असेल.

इथेनॉल उत्पादनाविषयी बोलताना वर्मा म्हणाले, की हे उत्पादन २०१८ च्या ३.५ बिलीयन लिटर वार्षिक क्षमतेपासून २०२५ पर्यंत १४ बिलीयन लिटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०२५ पर्यंत ६० लाख टन अतिरिक्त साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर करण्याचे उद्दीष्ट आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here