प्राज इंडस्ट्रीजकडून IOC सोबत एव्हिएशन फ्युएल ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी

पुणे : औद्योगिक जैव तंत्रज्ञान कंपनी प्राज इंडस्ट्रिज आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) शाश्वत एव्हिएशन फ्युएल (SAF/sustainable aviation fuel) उत्पादनासाठी एक जॉईंट व्हेंचर स्थापन करणार आहेत. एटीजे इंधन (Alcohol to Jet fuel) विमानांपासून होणारे उत्सर्जन रोखण्यासाठी मदत करेल.

प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सांगितले की, आयओसी बोर्डाने जेव्हीला मंजुरी दिली आहे आणि वर्षाच्या अखेरीपर्यंत आणखी मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. प्राज आणि आयओसीने अल्कोहोलपासून जेट (एटीजे) इंधन, १ जी, २ जी इथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनाला गतीने ट्रॅकवर आणण्याच्या संधी शोधण्यासाठी गेल्या वर्षी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले की, पानीपतमध्ये अमेरिकन क्लीनटेक कंपनी लांजाजेटच्या सहयोगाने पहिला एसएएफ प्लांट स्थापन करण्यात येत आहे. आणि ते प्राजसोबत दुसरा एसएएफ जेव्ही स्थापन करण्यासाठी तयार आहेत. त्यांनी सांगितले की, एका मजबूत एसएएफ तंत्रज्ञानाची गरज होती आणि प्राजची हीच भूमिका राहिली आहे.

वैद्य यांनी सांगितले की, त्यांना एसएएफच्या वापरासाठी एअरलाइन्सकडून गुंतवणूक आणि कटिबद्धता अपेक्षित आहे. अलिकडेच त्यांनी एअरलाइन्सच्या सीईओंसोहत एक बैठक घेतली आणि त्यांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची ईच्छा दर्शवली. वैद्य यांनी सांगितले की, आयओसीला प्लांटसाठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. मात्र, एअरलाइन्सकडून जेव्हीसाठी जे गरजेचे आहे, ती ऑफटेक कमिटमेंट होती. आणि एअरलाइन्स इक्विटी साठी उत्सुक होती. IOC SAF JVs मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविणाऱ्या प्रत्येक एअरलाइन्सला २-५ टक्के इक्विटी ऑफ लोडिंगवर विचार केला जाऊ शकतो.

चौधरी यांनी सांगितले की, एसएएफ हा एक स्वच्छ अवकाशासाठी पुढे आलेला पर्याय आहे आणि प्राज एसएएफमध्ये आशादायक संधी प्राप्त करण्यासाठी एक लवचिक उद्योग, परिस्थितीजन्य तंत्र विकसित करीत आहे. प्राज एसएएफसोबत मिश्रीत इंधनावर भारताच्या पहिल्या व्यावसायिक प्रवासी उड्डाणासाठी एअर एशिया आणि नागरी उड्डयन महासंचालकांसोबत चर्चा सुरू आहे.

SAF च्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्राजने Gevo, Inc USA यांच्यासोबत भागिदारी केली आहेत. SAF योजनांच्या निर्मितीसाठी प्राजने फ्रान्सच्या Axens सोबत MoU केला आहे. प्राज आणि इंडियन ऑईल जेव्ही २०३० पर्यंत प्रती दिन जवळपास ४०० ते ५०० टन एसएएफचे उत्पादन करण्यासाठी भारतामध्ये अनेक सुविधांची निर्मिती करतील अशी योजना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here