कोल्हापूर : ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ असून, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, संजय घाटगे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम दुपारी बारा वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे.

अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘बिद्री साखर कारखान्याने केवळ साखरनिर्मितीच न करता अन्य प्रकल्पही उभारून ते यशस्वी केले आहेत. कारखान्याचा सहवीज प्रकल्प यशस्वी झाला असून, त्यामुळे बॅलेन्स शीट अधिक सक्षम झाली आहे. बिद्री कारखान्याच्या २०१७-१८ च्या वार्षिक सभेत प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यास सभासदांनी मंजुरी दिली होती. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. प्रकल्प उभारणीसाठी अडचणींचा सामना करावा लागला असला तरी सुमारे ६८ कोटी रुपये खर्चुन अद्ययावत इथेनॉल प्रकल्प कारखाना कार्यस्थळावर साकारला आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here