कोल्हापूर : सरसेनापती घोरपडे कारखान्याची ऊस बिलात आघाडी, पहिल्या पंधरवड्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा

कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर १,२०,१४५ मेट्रिक टन इतके गाळप केले आहे. सरासरी १०.३८ टक्के साखर उताऱ्यासह १,१६,१०० क्विंटल इतकी साखर उत्पादित केली आहे. कारखान्याने एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर कालावधीत गाळप केलेल्या ५२,३०५ मेट्रिक टनाची ऊस बिलाची रक्कम २० कोटी ४० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले की, कारखान्याने चालू हंगामात सरसेनापती साखर कारखान्याने नऊ लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू केला. चालू हंगामात आजअखेर को-जन प्रकल्पातून ९३.६५ लाख युनिट इतकी वीज निर्मिती करून ५४.१५ लाख युनिट वीज कंपनीला निर्यात केली आहे. आसवनी प्रकल्पातून दोन कोटी लिटर्स स्पिरीट उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने पहिल्या पंदरवड्यात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ३,९०० रुपये ऊस बिल दिले आहे. आंदोलनादरम्यान, जिल्हा प्रशासनासमोर झालेल्या तोडग्यानुसार उर्वरित १०० रुपये गाळप हंगाम समाप्तीनंतर दिले जातील. शेतकऱ्यांनी ऊस बिलांसाठी आपापल्या बँकेशी संपर्क साधावा. कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here