पेट्रोलपंपाजवळ साखरेच्या ट्रक ने घेतली  पेट, अनर्थ टळला

116

कोल्हार : नगर मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथील उद्योजक अजितशेठ कुंकुलोळ यांच्या रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपावर सकाळी दहाच्या सुमारास कारखान्यातून साखर घेऊन निघालेल्या ट्रकचा डिझेल टैंक पेट्रोल पंपावर फुटल्याने ट्रकने पेट घेतला. यामध्ये साखर पोती  आगीच्या भक्ष्यस्थानी पडली . ट्रकचे अतोनात नुकसान झाले. मात्र दैव बलवत्तर असल्याने पेट्रोल पंपावर ट्रक पेटूनही मोठी दुर्घटना टळली.

कर्जत तालुक्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यातून कोपरगांव येथील गायत्री ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्र. एम पी 14 – जी. बी. 1477) मध्य प्रदेश येथे सुमारे 25 टन साखरेची  पोती घेऊन निघाला होता. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे डिझेल भरण्यासाठी हा ट्रक रिलायन्स पंपावर थांबला. पंपापासून अवघ्या काही फुटांवर सदर ट्रकचा  डिझेल टॅक
फुटला अन टायर गरम असल्याने ट्रकने अचानक पेट घेतला.

रिलायन्स पंपावरील कामगार व स्थनिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. अवघ्या काही मिनिटात विखे पाटील कारखान्याचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. सोबत कारखान्याचे डायरेक्टर स्वप्नील निबे व कामगारांनी आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न केले. अर्ध्यातासात सर्व आग आटोक्यात आली परंतु ट्रकचे जळून मोठे नुकसान झाले. तर ट्रक मधील काही साखर पोती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने अवघ्या काही  फूट अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपापर्यंत ही आग पोहोचली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here