महाराष्ट्र : राज्यात उत्पादित सर्व इथेनॉल खरेदीची केंद्राकडून ग्वाही – सहकारमंत्री पाटील यांची माहिती

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्रचनेसंदर्भात राज्य सरकारला आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच यासाठी लागणाऱ्या मान्यताही देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार राज्य सरकारने आवश्यक प्रस्ताव तयार केले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार धोरणामध्ये चांगला समन्वय असून, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा सहकार क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव या प्रक्रियेला बळ देणारा ठरत आहे. राज्यात उत्पादित होणारे सर्व इथेनॉल खरेदीची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. साखर कारखानदारांनी चिंता करू नयेण्याचे कारण नाही, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सहकार मंत्री पाटील म्हणाले, कर्जमाफीच्या अंमलबजावणी निवडणुकीनंतरच राज्य सरकारने जाहीर केलेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील सहकारी सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचे काम सुरू असून, त्याला अधिक गती देण्यात येणार आहे. तसेच जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाणी योजनांना कामाच्या प्रगतीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत पुणे येथील सहकार उपनिबंधकांकडून अभ्यास सुरू आहे. विधान परिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here