मुंबई : साखर निर्यातीसाठी बनावट बँक हमी देणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेला साखर निर्यात करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रची ६ कोटी ४३ लाख रुपयांची बनावट बँक हमी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी घाटकोपरमधील ‘मेक इंडिया इम्पेक्स’चे मालक राजेश नखुआ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साखर कोटा मिळवताना ही बनावट बँक हमी सादर करण्यात आली होती. कंपनीने साखरेच्या किमतीतील घसरण आणि अमेरिकेतील खरेदीदाराने करार रद्द केल्याचे कारण देत कोटा रद्द करून बँक हमी परत करण्याची मागणी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडे केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून बँक हमी वटवण्याची प्रक्रिया सुुरू झाल्यानंतर बनावट हमी दिल्याचा प्रकार उघड झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतातून साखर आयातीसाठी २०२४-२५ या कालावधीत ८,६०६ मेट्रिक टनांचा टॅरिफ-रेट कोटा निश्चित केला होता. त्यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने निविदा मागविल्या. यात ‘मेक इंडिया इम्पेक्स’ कंपनीची ८,५८४ मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी १,७८० डॉलर प्रति मेट्रिक टन दराची बोली मंजूर झाली. कंपनीला निर्यात कोटा मंजूर झाला. निविदेसोबत कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या बदलापूर शाखेचे ६.४३ कोटी रुपयांचे बँक हमीपत्र सादर केले होते. त्यानंतर प्राधिकरणाकडून कंपनीला ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्यातीचे प्रमाणपत्र मिळाले. मात्र, कंपनीने मुदतीत साखरेची निर्यात केली नाही. कंपनीने दर फरकाचे कारण देत निर्यात करणे टाळले होते. त्यानंतर प्राधिकरणाने बँक हमी वटविण्याचा प्रक्रिया सुरू केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या बदलापूर शाखेने हमीपत्र आपल्याकडून जारी करण्यात आले नसल्याचे कळविले. हमीपत्रावरील अधिकाऱ्याची स्वाक्षरीही संशयास्पद असल्याचे समोर आले. त्यानंतर प्राधिकरणाने तक्रार दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here