ब्राझीलच्या साखर उत्पादनाचा अंदाजच येईना!

1392

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

साओ पावलो (ब्राझील) : चीनी मंडी

ब्राझीलमध्ये साखर कारखाने कोणत्याही क्षणी साखर उत्पादन, इथेनॉलकडे वळू शकतात. पूर्वीपेक्षा हे तंत्रज्ञान अतिशय सोपे झाल्यामुळे जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधून किती साखर बाजारात येणार याचा अंदाज घेणे कठीण जात आहे.

या संदर्भात साओ पावलो येथील युसिना बटाटिस याचे उदाहरण घेता येईल. दोन वर्षांपूर्वी साखरेची किंमत कितीही असली तरी कंपनीकडे पर्याय नव्हता. त्यांनी त्यांच्याकडील ४५ टक्के ऊस साखर उत्पादनाकडे वळवला होता. आता हा आकडा पुढच्या हंगामासाठी ४५ वरून ३६ टक्क्यांवर आला आहे. उद्योग समूहाचे व्यवसायिक संचालक लुईज गुस्तावो जुनाक्विरिया यांनी ही माहिती दिली. त्यामुळे साओ पावलो येथे झालेल्या साखर उद्योगाच्या परिषदेत किती टक्के ऊस साखरेकडून इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आला, याचीच सर्वाधिक चर्चा झाली.

साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन क्षमता आणि साठवणुकीसाठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना उत्पादनासाठी कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी जे फायद्याचे आहे, त्याचे उत्पादन करण्याचा निर्णय ते घेतात. साओ पावलो येथील सोपेक्स ग्रुप या विश्लेषक संस्थेचे प्रतिनिधी फ्रान्सिली रिवेरो यांनी सांगितले की, या वर्षी ब्राझीलमध्ये इथेनॉल आणि साखर यांच्यातील युद्ध जास्त रंगले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिने हा काळ मोठ्या मंदीचा आहे. गुंतवणुकीसंदर्भातील स्थिती ही गेल्या सप्टेंबरपासूनची सर्वांत निराशाजनक स्थिती आहे.

जर, ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला तर, साखरेच्या बाजारात तुटवडा जाणवेल, अशी शक्यता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. तसे संकेतही मिळू लागले आहेत. साओ पावलो येथील युसिना बटाटिस कंपनीच्या कामाचा आढावा घेतला तर, परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. कंपनीने १ मार्चपासून यंदाच्या हंगामासाठी ऊस गाळप सुरू केले आहे. आतापर्यंतचा सगळा ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतातील इथेनॉलला १४.५ सेंट्स प्रति पाऊंड प्रमाणे दर मिळू लागला आहे. तर, न्यूयॉर्कच्या बाजारात साखरेचे दर १२.५२ सेंट्स प्रति पाऊंडवर स्थिरावले आहेत. गेल्या हंगामाचा विचार केला तर ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतातून साखरेच्या उत्पादनात २६ टक्क्यांनी घट पहायला मिळाली होती आणि तेथे इथेनॉललाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे १०० लाख टन साखर उत्पादनाला फटका बसला. परिणामी भारतातून साखर पुरवठा होण्यास बळ मिळाले.

यंदाही ब्राझीलमध्ये इथेनॉललाच प्राधान्य दिले जाणार आहे. कदाचित यंदा हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील सुकडेनचे व्यापारी इड्युरो सिया यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर, जैव इंधनाच्या किमती म्हणाव्या तितक्या आकर्षक नाहीत. पण, कंपनीला जगात साखरेचा तुटवडा जाणवेल, या मताशी सहमत आहे. अनेक कारणांचा जगातील साखर पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. कारखान्यांकडून मशिन्समध्ये कमी गुंतवणूक म्हणजे, संबंधित कारखान्याला साखर उत्पादनात १० टक्क्यांपेक्षा जास्त साखर उत्पादन कमी करण्याची मुभा मिळते, असे मत व्हिर्जिनिया सोरियाने लायरा लिएओ यांनी व्यक्त केले. केवळ एका कमांडवर साखर उत्पादन, इथेनॉलकडे वळवण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे आता इथेनॉलच्या किमतींचा फायदा उठवण्यासाठी मर्यादेच्या पलिकडे जाऊन त्याचे उत्पादन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here