गुलरिया, कुंभी कारखान्याकडून शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले अदा

गुलरिया आणि कुंभी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर या दोन्ही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२०-२१ मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी ब्रजेश पटेल यांनी सांगितले की, कुंभी साखर कारखान्याने आपण खरेदी केलेल्या उसापोटी ३६४७८.८८ लाख रुपये आणि गुलरिया कारखान्याने ३९,४७८.८८ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. जिल्ह्यातील अजवापूर साखर कारखान्याने आधीच उसाचे सर्व पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांपैकी तीन कारखान्यांनी उसाच्या थकबाकीचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. ऐरा साखर कारखाना आणि बेलराया सहकारी साखर कारखाना, संपूर्णानगरनेही शेतकऱ्यांना समाधानकारक पैसे दिले आहेत. जे पैसे थकीत आहेत, त्यांचे पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोला साखर कारखाना, पलिया साखर कारखाना आणि खंभारखेडा कारखान्याला तातडीने पैसे द्यावेत अन्यथा आरसीच्या कारवाईला सामोरे जावे असा इशारा देण्यात आला आहे. कारखान्यांकडून ऊस बिले मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऊस बिलांबाबत साखर कारखान्यांविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here