कर्मवीर काकासाहेब वाघ कारखान्याला दणका

लासलगाव : निफाड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात नेवासा तालुक्यातील सोनाई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 1 कोटी 73 लाख 9 हजार 117 रुपये वसुली संदर्भात रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना व अवसायक यांच्या विरुध्द दावा दाखल करण्यात आला आहे.

दिवाणी न्यायालयात मुळा सहकारी साखर कारखान्याने रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याविरुध्द दाखल केलेल्या वसुली प्रकरणात न्यायालयाने काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याची (रासाका) मालमत्ता जप्त करण्याचे आदेश बुधवारी (दि.11) दिले आहेत.

या प्रकरणात मुळा साखर कारखान्याच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची नांदुर्डी येथील मालमत्ता गट क्रमांक 325 मधील क्षेत्र 2 हेक्टर 81 आर आणि गट क्रमांक 327 मधील क्षेत्र 9 हेक्टर 5 आर अशी एकूण 11 हेक्टर 86 आर इतकी मालमत्ता जप्त करण्याबाबत मागणी करण्यात आली होती.

त्याबाबत कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याने आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. बी. काळे यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता नियम 54 आदेश 21 नुसार मालमत्ता जप्त करण्यासंबंधी वॉरंट बजावण्याचा आदेश दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here