पाकिस्तान: आठ साखर समुहांवर कारवाई

87

लाहोर : साखरेच्या दरात वाढ करणाऱ्या आणखी आठ साखर समुहांवर केंद्रीय तपास यंत्रणेने (एफआयए) कारवाई केली. एफआयएने गेल्या एक वर्षात साखरेच्या साठेबाजांवर साखरेच्या दरात वाढ करून सुमारे ११ अब्ज रुपयांची कमाई केल्याचे उघडकीस आणले आहे. या प्रकारात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. एफआयएने अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. सट्टा बाजारातील प्रमुखांकडून जप्त केलेले सुमारे ३ डझन मोबाईल फोन, लॅपटॉप यांच्या फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालाची प्रतीक्षा एफआयएला आहे.

एफआयए पंजाबच्या झोन एकचे संचालक डॉ. मुहम्मद रिझवान यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय साखर उद्योगातील सट्टेबाज, एजंटांवर कारवाई करीत आहोत. हा एक मोठ्या प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. त्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे. जेव्हा आम्हाला फोरेन्सिक अहवाल मिळेल, तेव्हा अटकेची कारवाई केली जाईल.

पंतप्रधानांचे देशांतर्गत घडामोडीतील सल्लागार शहजाद अकबर यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, आता खटले गुन्हे केले जात आहेत. त्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल.

एफआयएच्या संचालकांनी सांगितले की, तपास यंत्रणा याबाबत बँकांमधील देवाण-घेवणीचीही चौकशी करत आहे. सट्टा बाजारात काळ्या पैशांचा वापर केला गेला आहे. या प्रकारात लाहोर, फैसलाबाद, रावळपिंडी, हसीलपूर, बहावलपूर येथील १० प्रमुख साखर उद्योगातील व्यापारी यात सहभागी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here