पाकिस्तान : ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर साखर निर्यातीचे निर्देश जारी

इस्लामाबाद : वाणिज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (एसबीपी) ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार, साखर निर्यातीसाठी अधिकृत डिलर्सना (एडी) निर्देश जारी करण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारने निर्धारीत नियम व अटींनुसार साखर कारखान्यांना २,५०,००० मेट्रिक टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

एकदा मंजूर केलेला कोटा परत करणे, स्थलांतरीत करणे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्याची कोणतीही तरतूद नसेल. सिंध प्रांतासाठी साखर निर्यात कोटा प्रांतामधील ऊस आयुक्तांकडून मंजूर करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत निर्यातीसाठी संघ/प्रांतीय सरकारांकडून कोणतीही निर्यात दिली जाणार नाही. एसबीपीने एडीला आपल्या संबंधीतांना निर्देश देणे तसेच निर्देशांचे सावधगिरीने पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here