पाकिस्तान: इमरान सरकारच्या कार्यकाळात साखरेच्या किमतीत वाढ

129

जेव्हापासून पाकिस्तान मध्ये नवे सरकार आले, तेव्हापासून महागाई च्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशामध्ये साखरेच्या किमतीत ही मोठी वाढ झाली आहे.

पंतप्रधान इमरान खान आणि कॅबिनेट सदस्यांना 6 ऑक्टोबर ला आयोजित बैठक़ीमध्ये सांगण्यात आले होते की, सध्याचे सरकार, जे ऑगस्ट 2018 मध्ये सत्तेत आले आहे, या कार्यकाळात साखरेच्या किंमतींमध्ये 73 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये साखरेची किंमत 55.84 रुपये प्रति किलो होती आणि सप्टेंबर 2020 अखेरपर्यंत ही वाढून 96.62 रुपये प्रति किलो झाली आहे. याचा फटका नागरीकांना बसला आहे.

योजना, विकास आणि विशेष मंत्री असद उमर यांनी संवेदनशील मूल्य संकेतक (एसपीआई) कडून मापण्यात आलेल्या उच्च महागाई दरावर कॅबिनेट सदस्यांचे लक्ष केंद्रित केले, खासकरुन खाद्य पदार्थांच्या किंमतीकडे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here