कमकुवत मान्सून आणि इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे पोल्ट्री खाद्य महागले

नवी दिल्ली : भारतातील मांस विक्रेत्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे कोंबड्यांच्या खाद्याच्या (पोल्ट्री फीड) किमतींमध्ये झालेली वाढ. मिंटच्या वृत्तानुसार, कमकुवत मान्सूनमुळे मका पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इथेनॉल उत्पादकांकडून मक्याची मागणी वाढल्यानेही त्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

ब्रॉयलर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वजनाच्या प्रमाणात मका हा सुमारे ५५ ते ६५ टक्के असतो. त्यामुळे मक्याच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम पोल्ट्री उत्पादकांच्या उत्पादन खर्चावर होत आहे. वृत्तानुसार, पोल्ट्री उत्पादकांना मक्यासाठी मोजावी लागणारी किंमत सप्टेंबरच्या अखेरीस वाढून प्रतिकिलो २७ ते २८ रुपये झाली आहे. २०१९ मध्ये ही किंमत प्रतिकिलो १२ ते १४ रुपये होती. इथेनॉलच्या उत्पादनासाठीही मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

ChiniMandi WhatsApp Channel

मक्याच्या किमती वाढण्यामागे कमकुवत मान्सूनचाही मोठा वाटा आहे. नंदूजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र पसुपर्थी यांच्या अंदाजानुसार, दुष्काळामुळे पिकाचे नुकसान झाल्याने यंदाच्या हंगामात कर्नाटकातील मक्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले आहे.पसुपर्थी म्हणाले, “यामागे अनेक कारणे आहेत. इथेनॉल उत्पादनासाठीही मक्याचा काही भाग वापरण्यात आला आहे, तसेच कर्नाटकात दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.”त्यांनी सांगितले की, सध्या मक्याच्या पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून मका मागवला जात आहे.मक्याचा अपुरा पुरवठा, कमकुवत मान्सून आणि इथेनॉल उद्योगाकडून वाढती मागणी यामुळे पोल्ट्री खाद्य महाग होत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here