बागपत, उत्तर प्रदेश: दोन नोव्हेंबर ला ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या हस्ते सहकारी साखर कारखाना बागपत मध्ये नव्या गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे. कारखान्यातील मशीन्सची दुरुस्ती आणि देखभालीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जे काही थोडे फार काम बाकी राहिले आहे ते एक दोन दिवसात पूर्ण होईल. यासाठी कामगार दिवस रात्र कामात व्यस्त आहेत. मशीनचे ट्रायल सुरु आहे.
शेतकरी आणि कामगारांना कोरोनापासून वाचवण्यासाठी साखर कारखाना परिसराची साफ सफाई करुन जागोजागी सूचना लिहिल्या आहेत.
साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर के जैन यांनी सांगितले की, ऊस गाळप करण्यासाठी साखर कारखाना फीट आहे. अधिकांश क्रय केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. ऊसखरेदी केंद्र वाटप होणे बाकी आहेत, पण गेल्या वर्षाप्रमाणे कारखाना गेट शिवाय 32 खरेदी केंद्रांवर शेतकर्यांचा ऊस खरेदी करण्याची तयारी करण्यात आली आहे.
शेतकर्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी, पेयजल, यार्ड मध्ये प्रकाश आणि शेतकरी भवन मध्ये आराम करण्याची सुविधा मिळेल. बागपत साखर कारखान्यामध्ये 20 हजारापेक्षा जास्त शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत. शेतकर्यांना साखर कारखाना सुरु होण्याची तिव्र प्रतिक्षा आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.












