उच्च प्रतीच्या साखरेचे उत्पादन करा : जिल्हाधिकारी

मऊ : जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी किसान सहकारी साखर कारखान्यासह आसवनी युनिटची पाहणी केली. कारखान्याच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासह त्यांनी चांगल्या गुणवत्तेच्या साखर उत्पादनाचे निर्देश दिले. साखर कारखान्याने अधिकाधिक ऊस आपल्या कार्यक्षेत्रातून मिळवावा आणि शेतकऱ्यांना ऊस पाठवताना अडचणी निर्माण होऊ नयेत याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले.

अमर उजाला डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ऊस खरेदी केंद्रांवरही अडचणी येऊ नयेत याबाबत दक्षता घ्यावी असे अधिकाऱ्यांना सांगितले. जर साखर कारखान्याने चांगल्या प्रतीची साखर निर्मिती केली, तर बाजारात मागणी वाढेल. कारखान्याला अपेक्षित उत्पन्न मिळेल. त्यातून कारखान्याचा तोटा कमी करण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी अरुण कुमार म्हणाले.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आसवनीची पाहणी केली. येथील इथेनॉल प्लांट पाहिला. आसवनीचे व्यवस्थापक एन. बी. सिंह यांनी इथेनॉल उत्पादन करणाऱ्या प्रक्रियेची माहिती दिली. व्यवस्थापकांनी सांगितले की येथे दररोज २० हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाते. यावेळी सरव्यवस्थापक एल. पी. सोनकर, मुख्य अभियंता के. के. सिंह, आसवनीचे व्यवस्थापक एन. बी. सिंह, सीसीओ रामसेवक यादव यांच्यासह चीफ केमिस्ट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here