पुणे : संत तुकाराम कारखान्यातर्फे ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर, २१ शेतकरी सहभागी

पुणे : संत तुकाराम साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, बारामतीचे कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना कार्यक्षेत्रात दोन स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत. कारखान्याच्यावतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) वापर करण्यात येत आहे. या उपक्रमात २१ शेतकरी सहभागी झाले आहेत. कारखान्यामार्फत सन २०२५-उत्पादनात सुधारणा होणेसाठी उभ्या ऊस पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत २३० एकर ऊस क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी केलेली आहे अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी दिली.

याबाबत कार्यकारी संचालक एस. जी. पठारे म्हणाले की, ऊस विकास योजनेत मॅपिंग करुन मृदा, आद्रता, सॅन्सर बसविणेत आलेले आहेत व अॅपव्दारे हवामान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किड पूर्व सूचना याबाबतच्या शिफारशी शेतकऱ्यांना मिळत आहेत. ऊस पिकावर व्हिएसआयतर्फे निर्मित वसंत ऊर्जा, मल्टिमायक्रोन्युट्रियंट, वाढीच्या अवस्थेप्रमाणे मुख्य अन्नद्रव्यांची फवारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सोमाटणे, कासारसाई, पवनानगर व मरकळ गटातील मौजे दारूंब्रे, सांगवडे, शिरगांव, धामणे, गोडंब्रे, साळुंब्रे, पाचाणे, उर्से, कासारसाई, नेरे, कडधे, ब्राम्हणोली, येळसे महागाव, काले, मरकळ या गावांत फवारणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या २५ ते ३०टक्के अतिरिक्त पाण्याच्या वापरात, ३० ते ४०टक्के किटकनाशके व बुरशीनाशकांची बचत होत झाली आहे. शेतकऱ्यांना किमान ३५ ते ४० टक्के ऊस उत्पादन वाढ अपेक्षित आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here