परराज्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांना केले क्वॉरंटाईन

143

लहान शहादा: कोरोनाची दहशत सध्या सर्वत्र वाढतच आहे. यामुळे सरकारने लॉक डाउनही वाढवले आहे. या काळात परराज्यात असणाऱ्या ऊस तोड मजूर, कामगार यांना आपापल्या गावात परतण्याची सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार गुजरातमध्ये ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतले आहेत. अशा २०० मजुरांना दुधाळे, ता.नंदुरबार येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव पाहता गावागावात भिती चे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावागावात त्यांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत आहे. गावात मजूर आल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच जिल्हा प्रशासन सज्ज होते. जिल्हा प्रशासनाचे आरोग्य पथक गावात दाखल झाले आणि संबधित सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुठल्याही मजुराला कोरोना संदर्भातील काहीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना लागलीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here