शंभूमध्ये रेल रोको : अन्नधान्य वाहतुकीला फटका, इथेनॉल उद्योगही संभ्रमात

पटियाला : जिल्ह्यातील शंभू येथे शेतकरी संघटनांकडून सुरू असलेल्या ‘रेल रोको’ आंदोलनाचा परिणाम केवळ अन्नधान्य आणि खतांच्या वाहतुकीवरच झाला नाही तर राज्यातील इथेनॉल निर्मिती युनिटवरही परिणाम झाला आहे. शंभू हा पंजाब आणि जम्मू-काश्मीरला जाणारा एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या तीन शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी बुधवार, 17 एप्रिलपासून शंभूमध्ये संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा (KMM) च्या बॅनरखाली आंदोलन सुरू झाले. सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान नवदीप जलबेरा, गुरकीरत शाहपूर आणि अनिश खतकर यांच्यासह तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.

किसान मजदूर मोर्चाचे प्रमुख सर्वनसिंग पंढेर म्हणाले की, आम्हाला रेल्वे वाहतूक रोखायची नाही, परंतु आमचे तीन शेतकरी कोणत्याही दोषाशिवाय तुरुंगात असल्याने आम्हाला तसे करावे लागले. 13 फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी अडकले आहेत. शेतकरी आंदोलनाचा तांदूळ वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. राज्याच्या राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी तरसेम सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनामुळे तांदळाची वाहतूकही मंदावली आहे.

इथेनॉल उद्योगाची चिंता वाढली आहे…

पंजाबला बिहार आणि इतर राज्यांतून दररोज किमान दोन ते चार रेक मक्का मिळत होता, मात्र जेव्हापासून आंदोलन सुरु झाले आहे तेव्हापासून पुरवठ्यात अडथळे येऊ लागले आहेत. मक्क्याचा 14 इथेनॉल प्लांटमध्ये कच्चा माल म्हणून वापर केला जातो, ज्यांची दैनदिन उत्पादन क्षमता 30 लाख लिटर आहे.पंजाबमधील दोन इथेनॉल प्रकल्पाचे मालक राणा इंदर सिंग म्हणाले कि, आम्हाला कच्च्या मालाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे उत्पादन मंदावले आहे, आणि आम्ही आमच्याकडे जे काही स्टोरेज आहे त्यावर अवलंबून आहोत. राणा इंदर सिंग यांचा अमृतसरमध्ये बट्टर सेव्हियन आणि तरनतारन जिल्ह्यात इथेनॉल प्लांट आहे. इथेनॉल उत्पादकांना भिती आहे की पुरवठा खंडित होत राहिल्यास त्यांना उत्पादन थांबवावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here