पुणे विभागात पावसाची तूट वाढण्याची शक्यता

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या नव्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट वाढण्याची शक्यता आहे, असे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याचा अर्थ ३० जून ते ६ जुलै या कालावधीत दक्षिण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सामान्य प्रमाणापेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. चार जिल्ह्यांत सद्यस्थितीत ६० टक्के अथवा त्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. आयएमडीने सांगितले की, पुढील काही दिवसांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व्यापक प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यानंतर किमान ५ ते ६ जुलैपर्यंत पाऊस कमी होईल अशी शक्यता आहे.

कोकण-गोवा या विभागात २ जुलैपर्यंत जोरदार पावसाचे पूर्वानुमान आहे. तर मध्य महाराष्ट्रात केवळ ३० जून रोजी ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, आयएमडीने २ जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्रासाठी व्यापक पावसाबाबतचे पूर्वानुमान जारी केले आहे. म्हणजेच, मध्य महाराष्ट्रात ५१ – ७५ टक्के केंद्रे आणि ठिकाणांवर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही ४ जुलैपर्यंत बहुशांत दिवसांत हलक्या पावसाचे अनुमान
वर्तविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here