रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ, कर्जांसह ईएमआय महागणार

देशातील केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेनेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर निर्णयांची घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.५० बेसीस पॉईंट वाढ केली आहे. त्यामुळे आता हा दर ५.४० इतका झाला आहे. यातून आता कर्जदारांच्या इएमआयमध्ये खूप मोठी वाढ होणार आहे. आरबीआय गव्हर्नर दास यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा दर म्हणजेच जीडीपीचे अनुमान ७.२ टक्क्यांवर कायम राहील, अशी शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिटेल महागाई दराचे अनुमान ६.७ टक्के इतके कायम ठेवण्यात आले आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आपली अर्थव्यवस्था गतीने वाढण्याचे अनुमान आयएमएफसह अनेक संस्थांनी वर्तविले आहे. ही सर्वाधिक गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. रेपो रेटसह आरबीआयने एसडीएफमध्ये ४.६५ टक्क्यांवरून ५.१५ टक्के वाढ केली आहे. याशिवाय मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ५.१५ वरून ५.६५ टक्के करण्यात आला आहे. भारतीय रुपयात होणाऱ्या घटीचे मुख्य कारण अमेरिकन डॉलर मजबूत होण्यात आहे, असे आरबीआय गव्हर्नर म्हणाले. जागतिक स्तरावरील इतर चलनांच्या तुलनात्मक रुपात रुपयाची घसरण कमीच असल्याचे त्यांनी सांगितले. आरबीआयच्या धोरणांमुळे रुपयात घसरण रोखली जात आहे. भारतात चौथा सर्वात मोठा परकीय चलनसाठा आहे. आणि पहिल्या तिमाहीत देशात १३६० कोटी डॉलरचे एफडीआय गुंतवणूक आल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेवर दबाव असल्याचेही गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here