इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या कधीपर्यंत भरू शकतो आयटीआर

करदात्यांना दिलासा देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यामुळे करदात्यांना असेसमेंट इअर २०२१-२२ या वर्षासाठी आयटीआर भरण्यासाठी आणखी मुदत मिळणार आहे.

आयकर विभागाने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आयटीआर आणि विविध ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यासआठी अंतिम मुदत वाढवली आहे. आयटीआर दाखल करण्यासाठी आता ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम मुदत आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर २०२१ ही मुदत होती. अशाच पद्धतीने इन्कम टॅक्स कायद्यानुसार जमा करण्यात येणाऱ्या ऑडिट रिपोर्टचा अवधी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यत वाढविण्यात आला आहे. आता याची अखेरची मुदत १५ जानेवारी २०२२ पर्यंत आहे. अशाच इतर काही बाबतीत मुदत २८ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविली आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की इन्कमटॅक्स रिटर्न आणि विविध ऑडिट रिपोर्ट दाखल करताना करदात्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळए अर्थमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. इन्कमटॅक्स विभागाने यावर्षी सात जून रोजी नव्या पोर्टलची सुरुवात केली होती. मात्र, त्यात सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वेबसाईट तयार करणाऱ्या इन्फोसीस कंपनीकडे याबाबत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here