थकीत ऊस बिले लवकर देण्याची सरकारकडे मागणी

बागपत : विभागात शेतकऱ्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सरकारने थकीत ऊस बिले लवकरात लवकर द्यावीत अशी मागणी करण्यात आली. अनेक कारखान्यांनी ऊस बिले न दिल्याबद्दल बैठकीत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चौगामा विभागातील शेतकरी खतौली, दौराला, मन्सूरपूर, भैसाना, किनौनी आणि मलकपूर साखर कारखान्याला आपला ऊस पाठवतात. यापैकी खतौली, मन्सूरपूर, दौराला या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऊस बिले जमा केली आहेत. तर भैसाना, किनौनी, मलकपूर या कारखान्यांनी अद्याप गेल्या गळीत हंगामातील ऊस बिलेही शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. थकबाकी न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीला तोंड देत आहेत. शेतकऱ्यांना घर चालविण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. सरकारने लवकरात लवकर पैसे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीस राजपाल सिंह, हरवीर सिंह, जसवीर सिंह, अता इलाही, नूर हसन, यामीन, नहार सिंह, ओमपाल सिंह, रोजूदीन, नशीर, कंवरपाल सिंह, हुसैन खां आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here