महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत निर्बंधात शिथिलता नाही: आरोग्य मंत्री टोपे

43

मुंबई : ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते पाहता महाराष्ट्रात किमान फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत निर्बंध कायम ठेवले जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. सध्याचा रुग्णवाढीचा वेग पाहता जानेवारीचा अखेरचा आठवडा अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाचे रुग्ण छोट्या शहरांमध्ये वाढत आहेत. त्यामुळे या विषाणूला रोखणे हा एकमेव उपाय असल्याचो आरोग्य मंत्री टोपे यांचे म्हणणे आहे. तर यासाठी योग्य प्रतिबंध आणि लसीकरण हेच उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मंत्री म्हणाले, गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या घटल्याचे दिसू लागले आहे. मात्र, कोरोना वाढीचा वेग कमी होत असल्याचा अर्थ यातून निघत नाही. आताही ४६००० सक्रीय रुग्ण आहेत. केंद्राकडून कोविशिल्डचे ५० लाख तर कोव्हॅक्सिनचे ४० लाख डोस मागितले आहेत. लसीकरणासाठी आता सक्ती करावी लागेल अशी शक्यता आहे. लोक धान्यासाठी सवलत मागतात.

पण लसीकरणाची विचारणा केल्यावर मागे फिरतात. आम्ही जिल्हा स्तरावर लोक लसीकरणासाठी कसे येतील यासाठी प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. सध्या ४०० मेट्रिक टन प्रती मागणी आहे. जर हे प्रमाण ७०० मेट्रिक टनापर्यंत पोहोचले, तर निर्बंध अधिक कडक होतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here