संभल : शेतकऱ्यांची उर्वरीत थकीत बिले देण्याची मागणी

संभल : राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले मिळावीत या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकारी सुनील कुमार त्रिवेदी यांना सुपूर्द केले. मंझावलीतील वीनश साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची २००६-०७ मधील बिले थकीत आहेत. याशिवाय गेल्यावर्षी, २०२२-२३ मध्ये कारखान्याने केवळ ४ जानेवारीपर्यंतची बिले अदा केली आहेत. उर्वरीत १२० दिवसांची बिले तातडीने देण्याचे निर्देश प्रशासनाने द्यावेत.

याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी कामगार संघटनेने युरीया खत खरेदी करताना जबदरस्तीने इतर औषधे दिली जात असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. नियमानुसार कुपनलिकांना वीज पुरवठा करावा. सध्या केवळ तीन ते पाच तास वीज पुरवठा केला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ओव्हरलोड होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरऐवजी नवा ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणीही करण्यात आली.

पशूवैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने जनावरांचा मृत्यू होत असल्याबाबतही तक्रार करण्यात आली. मोकाट जनावरांना गोशाळेत पाठवावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष कुलदिप चौधरी, गुरमीत सिंह, जगपाल सिंह, अनिकेत, संजीव कुमार, रविंद्र कुमार, सतवीर सिंह, नफीस अहमद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here