सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर, साखराळे येथील बियाणे मळा परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ऊर्फ प्रकाशराव पवार, संचालक शैलेश पाटील, प्रताप पाटील, दादासाहेब मोरे, दिलीपराव देसाई, राजकुमार कांबळे, प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे, सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील प्रमुख उपस्थित होते. कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल युनिट कार्यस्थळी संचालक दीपक पाटील, अमरसिंह साळुंखे यांच्या हस्ते आणि कारंदवाडी युनिट कार्यस्थळी संचालक प्रदीपकुमार पाटील, रघुनाथ जाधव, वैभव रकटे यांच्या हस्ते, तर तिप्पेहळ्ळी-जत युनिट कार्यस्थळी संचालक विठ्ठल पाटील, रमेश हाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
साखराळे येथील कार्यक्रमात ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ऊर्फ प्रकाशराव पवार म्हणाले की, सध्या जगात ३ ते १० अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. कमी झालेले पाऊसमान आणि जीवघेण्या उकाड्याने आपण सर्वजण त्रस्त आहोत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी एक कर्तव्य म्हणून प्लास्टिकचा वापर बंद करून हवा, माती आणि पाणी संवर्धनासाठी कटिबद्ध व्हायला हवे. यावेळी संदीप पाटील, सुनील सावंत, धैर्यशील पाटील, प्रेमनाथ कमलाकर, अनिलकुमार पाटील, महेश पाटील, धनाजी लाड, भोपाल पवार, संभाजी खोत, विवेक पुजारी, स्नेहल पाटील उपस्थित होते. पर्यावरण अधिकारी राजेंद्र पाटील, श्रीकांत पाटील यांनी संयोजन केले. वाटेगाव-सुरुल येथील कार्यक्रमाला कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख, संताजी चव्हाण, संभाजी सावंत, माणिक पाटील, कृष्णात पाटील, दत्तात्रय गायकवाड, संग्रामसिंह चव्हाण, विजय पाटील, प्रताप गुरव, जयवंत पाटील, नंदकिशोर जगताप, प्रतीक मोरे, सागर लड्डी, प्रकाश पाटील, श्रीनिवास कुंभार, पंकज पाटील उपस्थित होते.


















