सातारा : अजिंक्यतारा कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी बांधावर मार्गदर्शन

सातारा : खोडवा ऊस पिकात कलिंगड, खरबूज आदी आंतरपिके घेतल्याने, उत्पादन खर्च निघून नफा शिल्लक राहतो. तसेच खोडवा पिकात पाचट ठेवणे आवश्यक असून, त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीची पूर्वमशागत करताना सबसॉयलरचा वापर करावा असे मार्गदर्शन पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व प्रकल्प समन्वयक धर्मेंद्र कुमार फाळके यांनी केले. शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा जिल्हा बँक आणि पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापन प्रकल्प प्रक्षेत्र भेट व शेतकरी चर्चासत्र उत्साहात झाले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रकल्प समन्वयक फाळके यांनी खोडवा ऊस व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. चा सल्ला देत, त्यांनी त्याचे फायदे सांगितले. ऊस बियाणे निवड प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन केले. ऊस रोपाची लागण करणे फायदेशीर असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मूलभूत ऊस बियाणांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रातील सातारा तालुक्यातील वनगळ, आरळे, गोजेगाव, नागठाणे, अतीत, वर्णे आणि निगडी वंदन येथे शेतकरी चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम झाला. पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here