सातारा : कृष्णा कारखान्यात सहकार विरुद्ध संस्थापक पॅनेलमध्ये थेट लढत, ‘रयत’ पॅनेलने घेतली माघार

सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या ‘सहकार’ व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या ‘संस्थापक’ पॅनलचेच अर्ज दाखल झाले. त्यामुळे कारखान्याची दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ‘रयत’ पॅनलकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. कारखान्याची निवडणूक २१ जूनला होणार आहे. दाखल अर्जांची छाननी सोमवारी होईल. कारखान्याची निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. मात्र, कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहितेंनी शस्त्रे खाली ठेवलीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

दरम्यान, एकेकाळी रयत पॅनलचे नेतृत्व करणारे कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी या निवडणुकीत सहकार पॅनलला पाठिंबा दिला आहे. ते सध्या अध्यक्ष डॉ. सुरेश भोसलेंच्या प्रचारात आहेत. त्यामुळे त्याचा फायदा सहकार पॅनलला होईल, असे बोलले जाते. कारखान्याच्या १९९९ च्या निवडणुकीत सत्तांतर होऊन डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे सत्ता आली. तर २००५ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तांतर होऊन डॉ. इंद्रजित मोहिते अध्यक्ष बनले. २०१०च्या निवडणुकीत मोहिते-भोसले यांचे मनोमिलन झाले, तेव्हादेखील अविनाश मोहिते अध्यक्ष झाले. २०२१ मध्ये प्रथमच तिरंगी लढत झाली. यात भोसलेंनी बाजी मारली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here