सातारा : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्यावतीने जरंडेश्वर शुगर मिल्सचा ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्काराने गौरव

सातारा: पुण्यात नुकत्याच झालेल्या ७१ व्या शुगर एक्स्पोमध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्यावतीने चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्काराचे गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांच्या योगदानाचे कौतुक झाले आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक गाळप क्षमतेच्या कारखान्यांमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्सने अल्पावधीतच अग्रस्थान मिळवले आहे. उपपदार्थ आणि ऊर्जा व्यवस्थापनावरही भर देण्यात आला आहे. कारखान्यात ५२ मेगावॅट क्षमतेचा को जनरेशन प्रकल्प, ३०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प उभारण्यात आला आहे.

जरंडेश्वर शुगर मिलचा प्रवास म्हणजे केवळ गाळप क्षमतेतील वाढ नसून, कारखान्याचे संचालक सचिन शिणगारे यांची दूरदृष्टी, आर्थिक शिस्त, काटकसरीचीकार्यसंस्कृती, नियोजन आणि शेतकरीहिताच्या बांधिलकीचे उदाहरण आहे. २०११ मध्ये अवघ्या २५०० टीसीडी गाळप क्षमतेपासून सुरू झालेला कारखान्याचा प्रवास आज १८ हजार टीसीडी क्षमतेच्या अत्याधुनिक एकात्मिक साखर संकुलापर्यंत पोहोचला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आर्थिक शिस्त, कार्यक्षमता, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऊस उत्पादकांच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य अशा सर्व बाबींची दखल घेत कारखान्याचा बहुमान करण्यात आला. कोरेगाव, सातारा, माण, खटाव, वाई आणि फलटण या तालुक्यांमधील वाढत्या ऊस उत्पादनाचा विचार करून, कारखान्याचा विस्तार करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास सचिन शिणगारे, कार्यालय अधीक्षक संदीप सावंत, वर्क्स मॅनेजर सुभाष थोरात, मुख्य शेती अधिकारी चंद्रकांत थोपटे, एचआर मॅनेजर दिगंबर गिडे, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब शिंदे, को-जनरेशन मॅनेजर सुहास रणवरे, फायनान्स मॅनेजर अनिल भगत, ईडीपी मॅनेजर राहुल भोसले आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here