सातारा : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित नवीन ई. व्ही. चार्जिंग स्टेशन व एम. पी. डी. डिझेल, पेट्रोल पंप कार्यान्वित करण्यात आला. याचे उद्घाटन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात झाले. संचालक संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, विलास भंडारे, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. कृष्णा कारखाना शेतकरी हितासह पर्यावरण रक्षणाला नेहमीच प्राधान्य देतो, अशी ग्वाही यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखाना मागील ११ वर्षात राज्यातील अव्वल कारखान्यापैकी एक कारखाना बनविला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले असून भविष्यातही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे. केंद्र शासनाचा प्रदूषण रोखण्याचा मानस आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्यानेही ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले आहे. त्याचबरोबर सीएनजी स्टेशनची सुविधा यापूर्वीच दिली असल्याने याचा निश्चितपणे फायदा परिसरातील वाहनधारकांना होणार आहे. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पवसेटवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















