सातारा: जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यु, सहा जखमी

205

सातारा, महाराष्ट्र: कोरेगाव तालुक्यातील चिमगाव मध्ये स्थित जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये एका मोठ्या बॉयलरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की, एका कर्मचार्‍याचा जागेवरच मृत्यु झाला आणि सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले. मृत कर्मचार्‍याचे नाव संभाजी घोरपडे आहे. जखमी मजुरांवर कोरेगावच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारखान्यामध्ये रात्री 10 वाजता बॉयलर चा स्फोट झाला. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस, अग्निशमन दर घटनास्थळी पोचले आणि आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्फोटामुळे कारखान्यांच्या जवळपास चार किलोमीटरच्या परिसराला धक्का बसला होता. कोरेगाव पोलिस घटनेची चौकशी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here